- फ्युचर डेव्हलमेंट कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोप्रायटरवर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- जमीन व्यवहारात एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारी २०१४ ते ३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बाणेर येथे घडली. रश्मी मांडा (३८, रा. वेदांग अपार्टमेंट, बाणेर, पुणे) यांनी बुधवारी (दि. ३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, काझाक्कुम शब्बर बाबू (३९, पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१४ मध्ये फिर्यादी रेश्मा यांचे पती जमीन खरेदी करीत होते. त्यावेळी फ्युचर डेव्हलमेंट कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोप्रायटर आरोपी काझाक्कुम याच्यासोबत मावळ तालुक्यातील ओवाळे येथे १६ हजार चौरस फूट जागा विकत घेण्याचे ठरले.
त्यानुसार रेश्मा यांनी आरोपीच्या खात्यावर आरटीजीएस आणि रोख स्वरूपात एकूण २२ लाख रुपये दिले. मात्र आरोपीने जमीन आणि पैसेही परत न देता त्यांची फसवूणक केली असे, फिर्यादीत म्हटले आहे.














