- ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात पालिकेची कठोर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- कोरोना संसर्गास प्रतिबंध म्हणून मास्क न वापरल्याबद्दल १ हजार नागरिकांकडून एकूण ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक २४ गणेशनगर या प्रभागात कोरोना महामारी काळात लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत मास्क परिधान न करणाऱ्या १ हजार नागरिकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
आजपर्यंत ५ लाख रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. ही दंडात्मक कारवाई सहाय्यक आयुक्त तथा ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू वेद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल तसेच कर्मचारी प्रशांत पवार, राजू जगताप, अभय दारोळे, अरुण राऊत, अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार यांनी केली.














