- सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाकेंचा विरोधी पक्षांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- कोवेिड सेंटरवरून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, नियमानुसारच कोविड सेंटर दिली होती. नुसते आरोप करण्यापेक्षा चुकीच्या कामांचे पुरावे द्या, त्यात कोणत्याही सत्ताधारी नगरसेवकाचा थेट संबंध आढळल्यास कारवाई केली जाईल, असे प्रत्युत्तर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिले.
कोविड सेंटरच्या बिलांच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र महापालिकेत दिसून येत आहे. शहरातील २३ कोविड सेंटरच्या २२० कोटींच्या बिलांपैकी ६५ टक्के बिले देण्याचा विषय स्थायी समितीने तहकूब केला आहे. त्यावर पेशंट नसतानाही महापालिकेकडून बिले दिली आहेत, असा आरोप शिवसेनेने केला होता. त्यास भाजपने उत्तर दिले आहे.
ढाके म्हणाले, कोरोना कालखंडातील कामांचे कौतुक राज्य सरकारने केले. कोरोना सेंटर सुरू करण्यासंदर्भात तयार केलेल्या नियमावलीनुसार बिले देण्याचा विषय प्रशासनाने आणला आहे. त्यात सत्ताधारी भाजपचा सहभाग नाही. त्यावरून विरोधक पक्षाला बदनाम करीत आहेत. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बिले दिली असतील. त्याबाबत माहिती घेऊ, याची चौकशी केली जाईल.














