- हॅकेथॉन स्पर्धेचे १ ते ३ मार्च रोजी आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी – चिंचवड स्टार्ट – अप इनोव्हेशन सेंटरच्या वतीने ‘ इन्फोफेस्ट ‘ कार्यक्रम २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन आयोजित केला आहे. तर, हॅकेथॉन स्पर्धा १ ते ३ मार्च या कालावधीत आयोजित केली आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी शुक्रवारी (दि. ५) दिली.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, किरण वैद्य, अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्व कल्पना व स्टार्ट अपला चालना देण्याचा प्रयत्न आहे. हॅकेथॉन स्पर्धेसाठी बुधवार (दि. ३) पासून प्रवेशिका स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हॅकॅथॉन समस्येचे निराकरण सबमिशन २६ फेब्रुवारीला आहे.
महाविद्यालयस्तरीय आयटूई स्पर्धेसाठी नोंदणी ६ फेब्रुवारीपर्यंत आहे. क्लस्टर स्तरासाठी आयटूई स्पर्धा ११ फेब्रुवारीनंतर आहे. बूट कॅम्प २३ ते २५ फेब्रुवारीला आहे. ७ विद्यापीठ स्तरावर अंतिम स्पर्धा २ व ३ मार्चला आहे. तर, हॅकेथॉन ज्यूरी फेरी १ ते ३ मार्चला आहे. शहरातील विजेत्यासाठी तीन लाख व उपविजेतेपदासाठी १ लाख बक्षीस आहे. तर, इतर गटांतील विजेत्यांनाही रोख रक्कमेची बक्षीसे आहेत. या संदर्भातील सर्व माहिती http://iil.uipune.ac.in आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, उद्योजक व कंपन्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
















