- पेठ क्रमांक २२ चे नव्याने रेखांकन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- देहूरोड दारूगोळा कोठारापासून दोन हजार यार्ड अंतरात येणाऱ्या संरक्षित क्षेत्राबाबतचा (रेडझोन) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ पी ‘ स्केच मोजणी नकाशा प्राधिकरणाला प्राप्त झाला आहे. पेठ क्रमांक २२ चे नव्याने रेखांकन करून हा नकाशा तयार केला आहे.
प्राधिकरणाच्या विकास योजना व सेक्टर रेखांकन नकाशावर त्यानुसार बदल केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या सभेसमोर चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. अन्य पेठांची मात्र नव्याने मोजणी झालेली नाही.
प्राधिकरणाची येत्या १० तारखेला सभा होणार आहे. या सभेत संबंधित प्रस्तावाबाबत चर्चा अपेक्षित आहे. पेठ क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सध्या न्यायप्रविष्ट आहे. हा प्रकल्प रेडझोन हद्दीत येत असल्याचा प्रमुख आक्षेप आहे. त्याला अनुसरून उच्च न्यायालयाने पेठ क्रमांक २२ येथील कोणता भाग रेडझोन हद्दीत येतो, याची मोजणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार रेखांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पेठ क्रमांक २२ येथील मोजणी करून ‘ पी ‘ स्केच नकाशा तयार केला आहे.
















