- छुप्या मिळकत कर वाढीला शहर राष्ट्रवादीचा विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- कोरोना संकटामुळे नागरिक हवालदिल असताना भाजपकडून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून पालिका आयुक्तांच्या अधिकारात करयोग्य मूल्य वाढवून छुपी मिळकत करवाढ लादण्यात आली आहे.
आयुक्त व सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून केलेली ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. आयुक्तांनी आगामी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी करयोग्य मूल्य प्रति चौरस फूट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आहे.
या निर्णयामुळे सन २००५ पूर्वीच्या मिळकतींना दुप्पट मिळकतकर द्यावा लागणार आहे. तर सन २००६ नंतर नोंदणी झालेल्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यात प्रति चौरस फूट सरसकट ५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका पिंपरी – चिंचवडमधील २००५ पूर्वीच्या २ लाख ५० हजार तर, सन २००६ नंतरच्या जवळपास तीन लाख मिळकतींना बसणार आहे.
















