- दोन महिलांची केली सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या हॉटेलवर भोसरी पोलिसांनी छापा मारून दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत दोघांना अटक केली. दिघी रोड, भोसरी येथे ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ लिंबा पाटील (वय २५), समाधान प्रकाश वाघ (वय २६, दोघे रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह हॉटेल चालक बाळा आण्णा शेट्टी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई शनिवारी रात्री पावणेआठ वाजता करण्यात आली. दिघी रोड, भोसरी येथील हॉटेल कावेरी लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका केली.