- अल्पवयीन मुलीसोबत केले अश्लील चाळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- रावेत येथील सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव लालबावणे (वय ६०, रा. रावेत) असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. रावेत येथील एका सोसायटीमध्ये आरोपी बाबुराव सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
















