- तीन ठिकाणाहून २८ लाखांच्या मुद्देमालासह चौघांवर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालाच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करीत विविध तीन ठिकाणाहून २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आळंदी येथील गोपाळपूरा येथील पत्रा शेडमध्ये अवैध दारु विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. गिरीराज चिमनलाल बैरवा (रा. गणपती मंदिराजवळ, आळंदी) आणि मिलिंद जनार्दन कांबळे (रा. धुंडरे आळी, आळंदी) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेथून दारु, वाहन आणि मोबाईल असा ८७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तळेगाव एमआयडीसी येथील इंदोरी – नानोली येथून तब्बल २७ लाख ७ हजारांची दारु आदी साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी गोविंद सखाराम गायकवाड (गावडे पेट्रोल पंपाजवळ, चिंचवड) व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिखलीतील मोरे वस्ती येथे सुरु असलेल्या मटका अड्डयावर छापा मारुन पोलिसांनी अजय राजेंद्र जैन (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला. जुगाराचे साहित्य व मोबाईल असा ५८ हजार ११० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.