- कासारवाडीतील युनिक डेल्टा फोर्समधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- कंपनीच्या सीईओने अधिकारातून सात लाखांची फसवणूक केली. तसेच, राजानीमा देउनही कंपनीचे महागडे मोबाईल स्वतःकडे ठेवल्याप्रकरणी रवींद्र शिवाजी पोमण (रा. मिरचंदानी पाम्स, फ्लॅट नंबर १२०४, रहाटणी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कासारवाडी येथील युनिक डेल्टा फोर्स सिक्यरिटी प्रा. लि. येथे हा प्रकार घडला. महेश विठ्ठल इराण्णा यांनी फिर्याद दिली आहे. पोमण हे कंपनीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) होते. पोमण याने २०१४ मध्ये कंपनीच्या खर्चासाठी वेगवेगळी कारणे सांगून दरमहा साठ हजार रुपये याप्रमाणे एकूण ७ लाख २० हजार रुपये काढले.
मात्र, त्याचा कोणताच हिशोब दिला नाही. ते पैसे स्वतःच्या फायदयासाठी वापरले. नाशिक येथील कार्यालयातून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे जवळ ठेवले. त्यानंतर कंपनीचा राजीनामा दिल्यावर कंपनीचे १ लाख २० हजारांचे दोन मोबाईल कंपनीकडे जमा न करता फसवणूक केली. तसेच कंपनीच्या नावाचा मोबाईल क्रमांक स्वतःच्या नावावर केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.