- चिखली पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- संशयावरून ताब्यात घेतल्यावर व्यक्तीवर जादूटोणा करीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गौतम पंढरीनाथ मोरे (वय ४०, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) याला बेड्या ठोकल्या.
आरोपी सात जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता कुदळवाडी येथील पेट्रोल पंपासमोरून चालला होता. त्याच्या हातात काळ्या रंगाचे गाठोडे होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई संतोष छबूलाल बांगर यांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. आरोपी पळून जाऊ लागल्यानंतर त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. तो गोविंद मोरे याच्याकडे चालल्याचे समजले.
त्याबाबत पोलिसांनी गोविंद मोरेची विचारपूस केली. आरोपीने पूजा केल्यावर तुमची प्रगती होईल असे सांगितल्याचे गोविंद मोरे याने सांगितले. आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.