- पालिकेकडून नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील कचरा गोळा करण्याचे काम ठेकेदारीने दिले असून, त्यानुसार कचरा उचलण्याच्या कामाची बिले दिली जातात. कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कचरा गोळा करणारे ठेकेदार हॉटेलांचा कचरा गोळा करीत असल्याचे प्रकरण रविवारी उघडकीस आले आहे. याप्रकरणी नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचा ठेका खासगी कंपन्यांना देण्यात आला आहे. टनानुसार बिले दिली जातात. या कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार राडारोडा भरूनही वजन वाढवित असल्याच्या घटना घडत आहेत.
याबाबत वाकड, कस्पटेवस्ती येथे एका वाइन शॉपच्या आवारात कुजलेला कचरा महापालिकेची यंत्रणा उचलत असल्याचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर चौकशी केली असता, खासगी जागेतील कचरा गोळा करीत.असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली असून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी खासगी जागेतील कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. करारनाम्यांचा भंग करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यात यामध्ये एनजी एनवायरो, रूपेश भागुजी जगताप, गणेश तुकाराम अर्जुने, आशुतोष लुईस मकासरे, आरीफ मेहबूब मकाशी, प्रतीक तावरे, तानाजी पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल करू नये, यासाठी सत्ताधारी राजकीय नेते दबाव आणण्याचे काम करीत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने दबावाला बळी न पडता ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.