- त्या व्यावसायिकाचा खुनासाठी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरीतील चिटफंड व्यावसायिक आनंद साहेबराव उनवणे (वय ४२) यांचे तीन ते चार जणांनी मिळून खुनासाठी अपहरण केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर अर्जुन चव्हाण यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद उनवणे ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असताना एका कारमधून तीन ते चारजण आले. आरोपी आणि आनंद यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आरोपींनी आनंद यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे पैशांच्या हव्यासापोटी अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे.