- खासगी कंपन्यांनी सी.एस.आर. फंडातून पालिकेला किती मदत केली..
- हिशोब द्या, राष्ट्रवादीच्या विशाल वाकडकरांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत, हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये. यापूर्वीही किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरला बिले अदा केली आहेत, त्याचा तपशील द्या. मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे, ते का प्रलंबित आहे, सी.एस.आर. फंडातून खाजगी कंपन्यांनी मनपास किती व कश्या प्रकारे मदत केली, त्याचीही सविस्तरपणे माहिती द्या, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने पालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पालिका आयुक्त हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सन २०१७ पासून स्थापत्य, पाणी पुरवठा जलनिस्सारण इत्यादी विभागामार्फत विविध विकास कामांसदर्भात निविदा काढल्या जातात. त्यामध्ये बहुतांश वेळा ठेकेदार व अधिकारी मिळून रिंग करुन ठराविक ठेकेदारांनाच निविदा मिळतील, अशा प्रकारे निविदा अटी शर्ती ठेवतात. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.
मार्च २०२० पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाय योजना युध्दस्तरावर चालू केल्या. यामध्ये मास्क, सँनिटाझर इत्यादीच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. त्याच प्रमाणे मनपामार्फत शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचे घाटत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गांच्या प्रतिबंधासाठी सी.एस. आर. अंतर्गंत विविध खाजगी कंपन्यांनीही मनपास मदत केली. परंतु त्यांनी किती मदत केली, कश्या स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही.
कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत, हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खाजगी कोविड सेंटरने जर बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत. तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरला बिले अदा केली आहेत त्याचा तपशील द्यावा. तसेच मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे, ते का प्रलंबित आहे तसेच शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यत कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी मनपाने किती रक्कम कश्या प्रकारे खर्च केली, सी.एस.आर.मधून खाजगी कंपन्यांनी मनपास किती व कश्या प्रकारे मदत केली, त्याचीही सविस्तरपणे माहिती द्या. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात वाकडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी नगरसेवक राज़ु बनसोडे, रा. यु. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर, राष्ट्रवादी पुणे विद्यार्थी अध्यक्ष करण कोकणे आदी उपस्थित होते.


















