- दापोडीत शहर मनसेची स्वाक्षरी मोहिम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘पेट्रोल दरवाढ कमी करा व गॅसची सबसिडी द्या’, अशी मागणी असणाऱ्या पत्रावर नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. त्याची सुरुवात दापोडीत करण्यात आली आहे.
हे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत मनसेचे उपविभाग प्रमुख अलेक्सझांडर आप्पा मोझेस, सतीश मथमर्थी, सागर भेगडे, सागर भोकरे, शुभम सटतालु, दिलीप ठोंबरे, अनिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, विक्रम शेळके, प्रशांत सांगळे, अनिल काची, अनिल कुलकर्णी व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.


















