- फिर्यादींच्या वाहनाला मोटार सायकल घातली आडवी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- कामावरून कमी केल्याच्या रागातून सहा जणांनी देहूतील आयुध निर्माणी फॅक्ट्रीच्या गेटसमोर गोंधळ घातला. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्याच्या वाहनाने नुकसान केले. याप्रकरणी सहा जाणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाजीराव टाळके, नितीन सुपारे, विक्रांत भोसले, गणेश हुवे, तानाजी नरसळ, अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत. बाळासाहेब सखाराम भांडवलकर (वय ४७, रा. नवले ब्रिजजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी निगडी ते देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयुध निर्माणी गेटसमोर फिर्यादींच्या वाहनाला मोटार सायकल आडवी लावली. त्यांना पुढे जाण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर गाडीला घेराव घालून मोटारकारवर दगडफेक केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.