- अंदाजपत्रकात वाढीव निधीची तरतूद करा..
- नगरसेविका अनुराधा गोरखेंची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाला अन्य ७ प्रभागांच्या तुलनेत सर्वात कमी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वाधिक लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या प्रभागाला स्थापत्यविषयक कामांसाठी अन्य प्रभागांच्या तुलनेत वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात गोरखे म्हणाल्या, अंदाजपत्रकात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्यविषयक कामांसाठी ९ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
अ प्रभागातंर्गत विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प २०२१-२२ या वर्षात घेतलेले आहे. त्यामुळे संबंधित प्रभागाला निधीची जास्त आवश्यकता लागणार आहे. तसेच, स्थापत्यविषयक तक्रारी, किरकोळ देखभाल व दुरूस्तीची कामे जास्त प्रमाणात करावी लागणार आहेत. त्यामुळे वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा.















