- पिडीतेचे व्हिडीओ चित्रीकरण करून बदनामी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते पीडित महिला व तिचा पती, इतर नातेवाईक तसेच मित्र – मैत्रिणींना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून बदनामी केली. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या चुलत दिराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे फिर्यादी विभक्त राहत होत्या. दरम्यान, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरी आला असता त्याने उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून फिर्यादी महिलेवर बलात्कार केला.