- रानमळा हॉटेलच्या बाजूच्या शेतात आढळला मृतदेह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- वाल्हेकरवाडी येथे एका अनोळखी तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील रानमळा हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या शेतात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. तरुणाचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष इतके आहे. अंगावर निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, मनगटावर पिवळ्या रंगाचे घड्याळ, गळ्यात पांढ-या रंगाचा रुमाल, रंग गोरा असे मयत तरुणाचे वर्णन आहे. याबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन चिंचवड पोलिसांनी केले आहे.