- आरटीओ प्रशासानकडून हालचाली सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- मोशीतील पिंपरी – चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त वा अटकावून ठेवण्यात आलेल्या, वाहनांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर त्या वाहनांचा लिलाव करण्याच्या हालचाली आरटीओ प्रशासानने सुरू केल्या आहेत.
या ठिकाणी जप्त केलेल्या व कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अटाकवून ठेवलेली जवळपास १५९ वाहने आहेत. पिंपरी – चिंचवड उप प्रादेशिक कार्यालयात जप्त केलेल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरटीओ कार्यालयाभोवती जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे.
आजघडीला दीडशेहून अधिक वाहने येथे आहेत. मोशी येथील मैदानावर ही वाहने पार्क करण्यात आली आहेत. नुकत्याच लागलेल्या आगीत दोन बस व दोन रिक्षांना त्याची झळ बसली. त्या अनुषंगाने मार्च अखेरपर्यंत केला जाईल, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


















