- पोलिसांनी चौघांना घातल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२१) :- प्रवाशांना कॅबमधून घेऊन जाताना चाकूच्या धाकाने त्याच्याकडील १५ हजारांचा ऐवज चौघांनी हिसकावला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सलमान साबीर शेख (वय २१), शुभम श्रीकांत जाधव (वय १९), प्रेम बालाजी पोतदार (वय १९), ललित हरिकेस करोटीया (वय २०, सर्व रा. काळेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
या चौघांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एक अनोळखी साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब कोंडीबा बंडगर (वय २८, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
शनिवारी (दि.१३) रात्री पावणे दोन वाजता भूमकर चौकाजवळ ही घटना घडली. शुक्रवारी रात्री भाडे घेवून मोटारीने फिर्यादी मुंबईच्या दिशेने जात होते. रात्री पावणे दोनच्या सुमारास भूमकर चौकातून युटर्न घेऊन सर्व्हिस रोडच्या कोप-यावर ते आले असता, आरोपींनी दुचाको मोटारला आडवी लावली. बंडगर यांना चाकूचा धाक दाखवून खिशातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा १५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.


















