- आज ३७० जणांना बाधा; चौघांचा मृत्यू तर, ३३० जणांना डिस्चार्ज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २७ फेब्रुवारी) रोजी ३७० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष चिंचवड ( ७१, ७५ वर्षे), वाल्हेकरवाडी (५१ वर्षे) तर, स्त्री पिंपरी (९० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०५२८१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०००७३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८४१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पालिकेने आज बाधित पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या जाहीर केली आहे. अ – ४३, ब – ६०, क – ३४, ड – ७२, इ – ६२, फ – ५१, ग २२, ह – २६, एकुण – ३७०.


















