- रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी १४ मार्चपर्यंत कायम…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- करोनानं डोकं वर काढलेल्या पुण्यात प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्रेक झाल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची माहिती दिली. “शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार! पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल,” अशी माहिती मोहोळ यांनी दिली.


















