- पिंपरी चिंचवड शहर व महापालिकेचा उद्या कळणार ‘परफॉर्मन्स’
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने सन २०१९-२० या कालावधीत भारतातील १०० शहरांसाठी राहणीमान दर्जा (Ease of living) व महापालिका कामकाजाचा दर्जा (Municipal Performance Indices) बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया व विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून १ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० या कालावधीत स्पर्धा आयोजित केली होती.
या योजनेचा निकाल गृह निर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी व गृह निर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थित उद्या गुरूवार (दि.०४) रोजी दुपारी १२.३० ते ०१.३० या वेळेत जाहीर होणार आहे.
हा कार्यक्रम सोशल मिडीयामार्फत Live प्रसारित होणार असून याबाबतची लिंक *Watch live on Facebook* https://www. facebook.com /smartcitiesmohua अशी आहे. नागरिकांनी या लिंकद्वारे थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने शहरवासियांना करण्यात आले आहे.


















