- सहा जणांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- बनावट कागदपत्रे सादर करून सहा जणांनी मिळून आरटीओ कार्यालयाची फसवणूक केली. ही घटना ७ नोव्हेंबर २०१४ ते २ मार्च २०२१ या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे घडली.
संदीप सुरेश कांबळे (५२, रा. पिंपळे रोड), सागर मारुती सूर्यवंशी, भल्ला महादेव कांबळे, अमर मूलचंदानी (तिघेही रा. पिंपरी), विनय विवेक आहाणा, अश्विन अशोक कामत (४९, रा. वानवडी), अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी प्रसाद पांडुरंग नलावडे यांच्या राहण्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणून बनावट भाडे करारनामा आरटीओत सादर केला. हा भाडे करारनामा बनावट असल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात उघडकीस आले आहे.












