- व्यवसायात भागीदारीच्या आमिषापोटी उकळले २५ लाख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- निगडी प्राधिकरणातील बिग व्हिजन आरओ वॉटर प्युरिफायर कंपनीतील मॅनेजिंग डायरेक्टरने फिर्यादी महिलेला त्याच्या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्याचे अमिश दाखवले. तसेच महिलेकडून त्यापोटी २५ लाख रुपये घेतले.
पैसे घेऊन महिलेला व्यवसायात भागीदार करून घेतले नाही. तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार २२ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घडला.
चंद्रकांत महादेव मोरे (वय ५५, रा. प्राधिकरण निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मोनिका ओमप्रकाश अग्रवाल (वय ३५, रा. कल्याण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















