- घरफोडी व वाहनचोरीतील तब्बल पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- वाकड पोलिसांकडून वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तीन सराईत चोरट्यांना अटक केली. पहिल्या घटनेत पोलीस अंमलदार प्रशांत गिलविले, सुरज सुतार व तात्या शिंदे यांना माहिती मिळाली की, घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगार ताथवडे येथे निलकमल हॉटेल समोरील रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने थांबले आहेत.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिलीप विश्वनाथ काळे (वय ३८) व रवि ऊर्फ रोहीत अनिल मारवे (वय २१, दोघे रा. म्हारळगांव, ता. कल्याण, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळून केलेल्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या तब्बल १३ गुन्ह्यांची कबुली दिली.
या चोरट्यांकडून १७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, सहा हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी दुचाकी, असा एकूण ९ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर , नितीन गेंगजे व विक्रम जगदाळे यांना सराईत चोरटा अक्षय अनिल काशीद (वय २४, रा. पवारनगर, थेरगाव) याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कस्पटेवस्ती येथील ॲम्बीयन्स हॉटेल समोर सापळा रचून अक्षय आला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
















