न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ५ मार्च) रोजी ६०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनाने पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दी बाहेरील मृत झालेले ०४ पुरुष रुग्ण हे रावेत (८० वर्षे), वडगाव शेरी (६७ वर्षे), खडकी (६३ वर्षे), जळगाव (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०७८३२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०१७१४ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५५ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – ७४ , ब – ९३, क – ७५, ड – १०४, इ – ६९, फ – ५७, ग – ८०, ह – ५० एकुण – ६०२ अशी आहे.
















