न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- मुंबई- बंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर वाकड येथे आदम नामक व्यक्ती हा शुक्रवारी सकाळी गळ्यावर वार झाल्याने जखमी अवस्थेत मिळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आदम याला रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदम भीमाप्पा (रा. काळखडक, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे.
















