न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ७ मार्च) रोजी ६२९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनाने पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील खेडमधील एका ४१ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०९०३४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०२३३९ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५६ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – ६५, ब – १०७, क – ६८, ड – १०२, इ – ८१, फ – ६८, ग – ७५, ह – ६३, एकुण – ६२९ अशी आहे.
















