- नगरसेविका अर्चनाताई तापकीर यांच्या उपक्रमाचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २५ जून २०२६) :- लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचे औचित्य समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करणाऱ्या नगरसेविका अर्चनाताई विनोद तापकीर यांच्या पुढाकारातून तापकीरनगर येथील दि काकाजब इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि अभिष्टचिंतन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हजारो नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा हा उपक्रम असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, सनि बारणे, उद्योजक प्रमोद चौधरी, माजी उपमहापौर शर्मिला बाबर, मनीषा योगेश चिंचवडे, नीता विलास पाडाळे, कोमल सचिन काळे, शालिनीताई कांतीलाल गुजर, श्रुती राम वाकडकर, रेशमा चेतन भुजबळ, आरती सुरेश चोंधे, स्नेहा रनजीत कलाटे, सविता नरेश खुळे, रवीना सागर अंघोळकर, पल्लवी महेश जगताप, तृप्ती संतोष कांबळे, प्रियंका सुनील कुदळे, राणीमाई पठारे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर व निलेश भगवान तापकीर यांच्या नेतृत्वाखाली अर्चनाताई तापकीर मित्र परिवाराने केले. सामाजिक उपक्रम, विकासकामे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून अर्चनाताई तापकीर यांनी निर्माण केलेल्या कार्यशैलीचे यावेळी उपस्थितांनी कौतुक करत, हा सोहळा परिसरातील सामाजिक जीवनातील संस्मरणीय उपक्रम ठरल्याची भावना व्यक्त केली.
















