- चिखलीकरांची टळणार गैरसोय; स्थायीसमोर प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- चिखलीतील गायरान जागेत महापालिकेच्या वतीने ८५० बेडचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी आराखडा तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे कामांवर देखरेख ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. संत तुकारामनगर येथील यशंवराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रूग्णालयाच्या धर्तीवर हे नवे रूग्णालय असणार आहे. त्यामुळे चिखली परिसरातील नागरिकांना जवळच्याजवळ माफक दरात वैद्यकीय उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.
परिणामी, वायसीएमवरील ताण कमी होणार आहे, दावा प्रशासनाने केला आहे. रूग्णालयाची इमारत उभारणीसाठी ३५० कोटी खर्चाच्या प्रस्तावाला पालिका सर्वसाधारण सभेने २० जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. बेडचे सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाअंतर्गत हे काम केले जाणार आहे.
रूग्णालय उभारण्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर निवीदा प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले होते. त्यासाठी बेरी बिल्टस्पेस डिजाईन (३.९० टक्के) प्रोकोनव्हीस कन्सल्टंट (४ टक्के), आकृती आर्किटेक्टस इंजिनिअर (५.३० टक्के) आणि ग्रुप कन्सस्टंटस (६.५० टक्के) यांचे दर पालिकेस प्राप्त झाले. बेरी बिल्टस्पेसची ३.९० टक्के इतकी आहेत. लघुत्तम दर प्रशासनाने मंजुर केला. सल्लागारास कामांच्या शासनाने टप्प्याटप्प्याने शुल्क अदा केले जाणार आहे. त्या खर्चास मंजुरी देण्याचा इमारत प्रस्ताव येत्या बुधवारी (दि.१०) खर्चाच्या होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर आहे.
















