- घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी:-
➖विद्यार्थिनी, भगिणी, कष्टकरी महिलांसाठी नवीन योजना
➖महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
➖घर खरेदी करताना महिलांच्या नावे नोंदी केल्यास मुद्रांक शुल्कातील प्रचलित दरात सवलत
➖ग्रामीण भागातील १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रवास मोफत
➖महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी महिला विशेष बस उपलब्ध करून देणार
➖संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, २५० कोटींचे बीज भांडवल
➖घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
















