- दहशतीने दुकानदारांनी दुकानं बंद व लोकं सैरावैरा धावू लागली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- ‘मी भोसरीचा दादा आहे, मला कुणी नडायचं नाही’ असे म्हणत परिसरात दहशत माजण्याचा प्रयत्न केला. भितीने आसपासच्या दुकानदारांनी दुकानं बंद केली व लोक पळून जाऊ लागले. काही काळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
चिकन दुकानदाराच्या गळ्याला तलवारी सारखं हत्यार लावून दोन किलो चिकनची मागणी केली व बळजबरीने दोन हजार रुपये घेतले. रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडून भिती निर्माण केली. रविवारी (दि. ०७) रात्री साडे आठच्या सुमारास सखुबाई उद्यान जवळील रमजान चिकन सेंटर येथे ही घटना घडली.
याप्रकरणी शमशुजजोहा जमाद शेख (वय २२, रा. भोसरी, मुळगाव – मुर्शिदाबाद, कोलकाता) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण राठोड, करण राठोड, अभिजित नलावडे व आणखी एकजण विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















