न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ८ मार्च) रोजी ४०१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनाने पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – चिखली (७४ वर्षे), पिंपरी (७४ वर्षे) ०१ स्त्री – पिंपळे गुरव (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – मुळशी (५२ वर्षे) ०१ स्त्री – आंबेगाव (६१ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०९४३५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०२७५३ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५९ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – ४३, ब – ७२, क – ५१, ड – ७९, इ – ४६, फ – २८, ग – ५५, ह – २७ एकुण – ४०१ अशी आहे.
















