न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- नेहरूनगर व मोशी येथील पिंपरी न्यायालयीन जागा निधीसंदर्भात शुक्रवार (दि. २१) रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. नवीन जागेच्या संदर्भात निधी मंजुर करुन देण्याचे आश्वासन यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, ॲड. अतिष लांडगे व बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या सूचनेनुसार पिपरी चिंचवड महापालिकेने सदरची जागा न्यायालयास ५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बजेट मिटींगमध्ये भाड्याच्या जागेत होणाऱ्या कोर्ट हॉल च्या फर्निचरसाठी व नवीन जागेच्या संदर्भात निधी मंजूर करून घेणार असल्याचे आमदार जगताप यांनी वकिलांना सांगितले. लवकरात लवकर नकाशे तयात करण्याच्या सुचना देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.










