- मुंबईतून घेतले ताब्यात; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- दि सेवा विकास को – ऑप बँकेकडून कर्ज घेऊन त्या पैशांचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर मूलचंदानी यांना पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. मात्र, स्वास्थ्य खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि सेवा विकास बँकेकडून कर्जदाराने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, कर्जाच्या रकमेचा विनियोग इतर कामासाठी केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास केला असता बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर मूलचंदानीचाही या आर्थिक अपहारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या त्यानुसार पोलिसांनी त्यांना मुंबई येथून रविवारी ताब्यात घेतले. मूलचंदानी याच्यावर आणखी गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात ‘वॉन्टेड’ आहे. पुढील कार्यवाही करून तपास करण्यात येईल, असे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
















