- न्यायालयाच्या आवारात उडाली खळबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- न्यायालयात हजर करण्यात आलेली महिला आरोपी कोरीला पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात कामकाजासाठी आलेले वकील, नागरिक, तसेच इतरांमध्ये खळबळ उडाली.
पिंपरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात महिला आरोपीला अटक केली. तिची आरोग्य तपासणीही केली. त्यानंतर मोरवाडी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपीला तुरुंगात पाठविण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिची कोरोना तपासणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ती महिला आरोपी कोरोना पॉझिटव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली.
अॅड . अतिश लांडगे म्हणाले, कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी होते. त्याचवेळी त्याची कारोना तपासणी होणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आरोपी महिलेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आरोपी अटक करतानाच त्याची करोनाची चाचणी करण्यात यावी.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी महिलेची आरोग्य तपासणी केली होती. मात्र, तुरुगात नेण्यापूर्वी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्णन्न झाले. महिला आरोपीच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील सहा पोलिसांची कोरोनाची अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. सध्या त्यांचे विलगीकरण करण्यात आले असून, खबरदारी घेतली जात आहे.
















