सुदैवाने जीवितहानी टळली; मालमत्तेचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- बुधवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास पिंपरीतील रिव्हर रोड, येथे लाकडाच्या कारखान्याला आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग भडकली आणि शेजारी असलेल्या भंगारच्या गोदामात पसरली.
त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या किराणा स्टोअर्स आणि स्टेशनरी दुकानात देखील ही आग पसरली. या आगीत लाकडाचा कारखाना, भंगार गोडाऊन, किराणा आणि स्टेशनरी अशी एकूण पाच दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पिंपरी-चिंचवड मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन आणि रहाटणी उप विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
















