- शहरात पुन्हा नव्याने लॉकडाऊनची चाहूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने शुक्रवारी (दि. ९) पासून (Garden) दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद करण्यात आली आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता दि. १ मार्च २०२१ पासून रात्री ११:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत संचार करणेस प्रतिबंध असेल, मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दुध, भाजीपाला, फळे इ.) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारी आस्थापना / व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबधित आस्थापनेवरील कर्मचा-यांना व त्यांची ने-आण करणा-या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आले आहे.
कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. हे आदेश दि. ०९.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.