- कॉंग्रेसच्या आंदोलनास भाजपचा देशभरात गाव आणि शहर पातळीवर जाऊन खुलासा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाला क्लीनचिट दिली असली तरी, काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. विरोधकांनी जनतेच्या समोर देशाच्या पंतप्रधानांविरोधात ‘ चौकीदार चोर है ‘ असे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उत्तर म्हणून पक्ष देशभरात गाव आणि शहर पातळीवर जाऊन यावर खुलासा करत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून भाजपचे पक्षाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली.
राफेल व्यवहार नेमका काय आहे? यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, या व्यवहारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सहभाग का नाही? रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार? यासंदर्भात पाठक यांनी माहिती दिली.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, प्रमोद निसळ, अमोल थोरात, संजीवनी पांडये, आर. एस. कुमार आदी उपस्थित होते.
राजकीय लाभासाठी देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार गेल्या ७० वर्षापासून काँग्रेसचे विविध नेते करीत आहेत. हे नवीन नाही असे सांगताना श्री. पाठक म्हणाले राफेल विमानाची निवड २०१२ मध्ये काँग्रेसच्या शासनानेच केली. पण कराराबाबत दोन्ही देशात एकमत होत नव्हते. कारण तेथे दलालीचा विषय निकाली निघत नव्हता. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे स्वीकारली आणि संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी सुत्रे स्वीकारली आणि या प्रकरणाची सुरुवात झाली. तोपर्यंत विमान खरेदी प्रकरण काँग्रेसने बासनात गुंडाळून ठेवले होते. काँग्रेसने केलेला करार फ्रान्सच्या द-सॉल्ट एव्हिएशन कंपनीला मान्य नव्हता. आता हा करार का मान्य नव्हता या खोलात गेल्यास त्याची खरी कारणे समोर येतीलच. ते यथावकाश कळेलच, असेही पाठक म्हणाले.












