- मुलाविरोधात वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- नवरा – बायकोची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने कात्रीने मारहाण केली. याप्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ९) रात्री सोळा नंबर बस स्टॉपजवळ, थेरगाव येथे घडली. अनिरुद्ध अप्पाराव वाघमारे (३२, रा. १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी सुमित आप्पाराव वाघमारे (वय २९) यांनी बुधवारी (दि. १०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अनिरुद्ध स्वयंपाक नीट केला नाही म्हणून पत्नीला मारहाण करीत होता.
त्यावेळी फिर्यादी सुमित आणि त्याचे आई – वडील मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यावेळी अनिरुद्ध याने स्वयंपाक घरात पडलेली कात्री उचलून त्याच्या आईला मारली. यामध्ये ती जखमी झाली. तसेच आठ महिन्याच्या मुलीलाही कात्रीने मारेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
















