- पोलिसांकडून आरोपीला आठ तासांच्या आत बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- जमिनीच्या व्यवहारातून चिंचवड येथील येथील मोहननगरच्या शिवसेना शाखाप्रमुखाचा खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी एका आरोपीला आठ तासांच्या आत अटक केली. मुळशी खुर्द येथे बुधवारी (दि. १०) सकाळी साडेआठच्या सुमारास खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (दि. १५) पोलीस कोठडी सुनावली आहे. विजय सर्जेराव सुर्वे (वय. ४०, रा. मोहननगर, चिंचवड), असे खून झालेल्या शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव आहे. हर्षद अशोककुमार राठोड (वय २९, रा. निगडी), अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी मोहम्मद (पूर्ण नांव माहिती नाही) फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारातून फिर्यादी यांचा आरोपींनी खून केला. त्यानंतर मुळशी खुर्द येथे मृतदेह टाकून देण्यात आला. बुधवारी सकाळी मृतदेह काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेऊन हर्षद राठोड याला अटक केली.
















