- सल्लागाराची नेमणूक; स्थायीची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- महापालिकेची मुख्य इमारत, सर्व प्रभाग कार्यालये, सर्व रुग्णालये, दवाखाने, कर संकलन कार्यालये, नाट्यगृह यांचे इलेक्ट्रीक, फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. यासाठी मुंबईच्या एका संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसमावेशक इलेक्ट्रीकल आणि फायर सेफ्टी ऑडिट करण्याकामी डीपीआर बनविणे, ऑडिट कामकाजावर नियंत्रण ठेऊन ते योग्य प्रकारे करुन घेण्यासाठी महापालिकेने संकेतस्थळावर कोटेशन नोटीस प्रसिद्ध केली होती. सल्लागार नेमण्यासाठी प्रेझेंटशनसाठी विविध एजन्सींना ९ फेब्रुवारी ला बोलविण्यात आले होते.
महापालिका कार्यालये, अनुषंगिक आस्थापना यांच्या इलेक्ट्रीकल आणि फायर सेफ्टी ऑडिट कामाकरिता तसेच ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटीनुसार व शिफारसीनुसार त्यापुढील कामकाजाकरिता आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना करणे, यंत्रणा उभारण्यासाठी एफएलस इंजिनिअरिंग या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
















