- भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजन तोंडाला मास्क न लावता एकत्र जमले होते. मोटर सायकलवर केक कापून मोठ मोठ्याने परिसरातील शांतता भंग केली.
कोरोना संसर्गजन्य आजाराचे नियमाचा भंग केला. शुक्रवारी (दि. १२) भोसरीतील सखुबाई गभाजी गवळी उद्यान, सार्वजनिक रत्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र दत्तात्रय जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अतुल गोकूळ शिंदे (वय २५, रा. खंडोबामाळ, भोसरी), गौरव डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), संकेत डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), दादु गव्हाणे (रा. भोसरी), अनिकेत गायकवाड (रा. दिघीरोड, भोसरी), राहुल गाढवे (रा. दिघीरोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.
















