- स्वी. नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची पोलीसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- फेसबुक च्या एका ग्रुपवर माधव खरे व दिलीप चव्हाण या विकृत समाजकंटकांनी देशासाठी लढलेल्या चापेकर बंधू यांच्याबद्दल बदनामीकारक अशी पोस्ट व्हायरल केलेली होती. त्यामध्ये चापेकर यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता असे म्हणून त्यांना धर्मांध अतिरेकी असे संबोधले आहे. या पोस्ट मुळे देशासाठी लढा देणाऱ्या तसेच अन्यायी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या चापेकर बंधू सारख्या महापुरुषांची बदनामी झालेली आहे.
ही बाब पालिकेचे स्वीकृत नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक काटे यांना निदर्शनास आणून दिली व संबधितांविरोधात पोलीस तक्रार करून कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली.
याप्रसंगी क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याबद्दल अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटक व्यक्तीविरूद्ध सायबर सेल तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक काटे यांनी तक्रार नोंद करून घेत. लवकरच अशा व्यक्तीवर कारवाई होईल असे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.


















