- घरकाम करणाऱ्या तरुणीचं कुटुंब भारावलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- आपल्याकडे घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर जॅकी श्रॉफ थेट या मुलीच्या घरी म्हणजेच मावळतील पवनानगर येथे पोहचले. श्रॉफ यांच्याकडे काम करणारी दीपाली तुपे या तरुणीच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.
वयाची शंभरी ओलांडलेल्या तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आज सकाळी जॅकी स्वत: दिपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं.
जॅकी यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली. जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी थेट आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेलं.
















