कोयत्याने डोक्यात वार; तिघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- पिंपळे निलख येथील बाणेर रस्त्यावरील हॉटेल विसावा येथे आरोपी १६ मार्च रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जेवण देण्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आरोपी आपल्या समवेत आणखी काही जणांना घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दगड फेकून मारले.
पासलकर त्याने माझ्या पोरांना जेवण देत नाही तुला माज आलाय का? मी इथला भाई आहे असे म्हणत कोयत्याने डोक्यात दोन वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा. पाखरे हाईट्स, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल धुमाळ, अंबादास पासलकर, अक्षय राक्षे, अभि मोरे, राजू फडतरे (सर्व रा. पिंपळे निलख) आणि सात ते आठ अनोळखी व्यक्तिंविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धुमाळ, राक्षे आणि मोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.















