- थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- इंद्रायणी नदीत मुबलक पाणी असताना देहूगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे २८ लाख ५५ हजार ९९ रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेसह, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचा देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने देहूकरांचा गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे.
ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंडित केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळजोड धारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे.
देहूगाव ग्रामपंचायतीचे ८ नोव्हेंबर २०२० मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडे नळपाणी पुरवठा विभागाचे सुमारे ३४ लाख रुपये थकले होते.















