- जिल्हा न्यायाधीशांच्या भेटीने न्यायालय स्थलांतराला गती – ॲड झोळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- मोरवाडी येथील न्यायालयाच्या स्थलांतर विषयावर पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांची पिंपरी – चिंचवड कर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. त्या प्रश्रावर सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही न्यायाधीश धोटे यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे प पदाधिकारी होते.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी सांगितले की, पिंपरी न्यायालयाची सध्याची इमारत कामासाठी दिवसेंदिवस अपुरी पडत असल्याने नेहरूनगर इमारतीत स्थलांतर होण्याची मागणी आहे. स्थलांतर करण्यासाठी महापालिका व न्यायालय प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी असोसिएशनचे पांडुरंग शिनगारे, मोनिका गाढवे, हरिश भोसुरे, धनंजय कोकणे, अमित गायकवाड, मंगेश नढे आणि प्राची शितोळे उपस्थित होते.















